
दारूचे पैसे मागितल्याच्या रागातून बिअरबार कामगारासह दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना 4 जूनला रात्री साडेनउच्या सुमारास हडपसरमधील बिअरबारमध्ये घडली.
सागर बाळोसो आटोळे (वय 20) आणि तन्मय अजित बेडगे (वय 23 रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दीनेश रघुपती नल्ला (वय 40 रा. गुरूवार पेठ) असे जखमीचे नाव आहे.
हडपसरमधील अमरसिद्धी कॉम्पेक्समध्ये बिअरबार असून त्याठिकाणी कामगार लक्ष्मण झिंजुर्डे काम करीत होता. त्यावेळी त्याने सागरकडे दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्यामुळे साथीदाराच्या मदतीने लक्ष्मणला कोयत्याने मारहाण करून जखमी केले. त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या दीनेश नल्ला यांच्यावरही कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करीत आहेत.

























































