
श्रीरामपूर शहर तसेच बेलापूर येथे दोघांना धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वॉर्ड नं. 2 नवी दिल्ली परिसरात राहणाऱ्यां इम्रान उर्फ मुल्ला युसूफ कुरेशी याच्याबरोबर साहिल अन्वर शेख व मनोज संजय साबळे या दोघांनी काहीतरी वाद काढून इम्रान यास शिवीगाळ केली. साहिल शेख व मनोज साबळे या दोघांनी त्याच्या मानेवर व डोळ्यावर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शेख व साबळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रामेश्वर पालीवाल हे बेलापूर येथे भाडोत्री खोली घेऊन व्यवसाय सुरू केला. दोन दिवसांपूर्वी बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.





























































