
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना कोकणचे हिरवेगार सौंदर्य, डोंगर, दऱ्या न्याहळता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाळी दरम्यान चालवण्यात येणाऱ्या तेजस एक्सप्रेसला यापुढे दोन विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला एक विस्टाडोम कोच जोडला जात आहे. त्याला प्रवाशांकडू चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकदा प्रवाशांना या कोचचे आरक्षण मिळत नाही. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने शुक्रवार 14 एप्रिलपासून 22119 आणि 22120 या दोन्ही गाडय़ांना आणखी एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विस्टाडोम कोचमधून प्रवास करताना कोकण न्याहळण्याची इच्छा बाळगलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


























































