
तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तृतीयपंथीयाला मारझोड करून तिचे जबरदस्ती केस कापण्यात आले. समाजमाध्यमावर याविषयीचा व्हिडियो शेअर झाल्यानंतर दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.
तृतीयपंथीयांच्या कार्यकर्ता ग्रेस बानो यांनी हा व्हिडियो समाजमाध्यमावर शेअर केला आहे. 19 सेकंदांच्या या व्हिडियोमध्ये दोन तरुण पीडित तृतीयपंथीयाचे केस वस्तऱ्याने कापताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करून आणि शिव्या दिल्या. तिचे कापलेले केस एका शेतात फेकून दिले. यावेळी दुसरी तृतीयपंथीय महिलाही तिच्या शेजारीच बसल्याचे दिसत आहे. तसेच या व्हिडियोमध्ये असेही दिसत आहे, एक तरुण या तृतीयपंथीय महिलांकडे बघून बोलत आहे की, ‘त्यांच्याकडे बघा. ते पुरुषांकडून पैसे उकळतात. त्यांच्यासोबत आता काय करायचं. आता संपलं.’
तामिळनाडूतील दक्षिण विभाग पोलिसांनी हा प्रसंग ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे नोहा आणि विजय अशी आहेत.
या घटनेबाबत तुतिकोरिनचे पोलीस अधीक्षक एल. बालाजी सरवणन यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ‘दोन्ही पुरुष दोन्ही तृतीयपंथीयांना चांगले ओळखतात. त्यापैकी एका पीडितेसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता, मात्र नंतर दोघेही वेगळे झाले. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. उर्वरित माहिती नंतर देण्यात येईल.


























































