मध्य प्रदेशमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, गुप्तांगात घातल्या काठ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मंदसौर

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे कायदे कडक करण्यात आले असले तरी देशात बलात्काराच्या घटना वाढतच असून मध्य प्रदेशमध्ये अक्षरश: माणुसकीला काळीमा फासेल अशी एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. मंदसौर येथे एक आठ वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी सामुहीक बलात्कार केला. बलात्कारानंतर या नराधमांनी त्या मुलीचे इतक्या निघृणपणे हाल केले आहेत. या मुलीवर एमवायएच रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची हालत बघून डॉक्टरही हेलावले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

पीडित मुलगी ही शाळेतून सुटल्यानंतर शाळेबाहेर तिच्या आजीची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. त्यावेळी या दोन नराधमांपैकी एक तिला लाडू देण्याच्या बहाण्याने स्वत:सोबत घेऊन गेला. त्यानंतर तो तिला जंगलात घेऊन गेला. तिथे त्याच्या मित्राने व त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ते तिला तेथेच टाकून निघून गेले. मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली त्यावेळी त्यांनी शाळेच्या जवळील जंगलात पीडित मुलगी जखमी अवस्थेत आढळली. त्यानंतर तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल करण्याात आले.

या नराधमांनी त्या मुलीचे इतक्या निर्दयतेने हाल केले आहेत की तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरही मुलीची अवस्था बघून हादरले आहेत. ‘बलात्कार करणाऱ्यांनी मुलीचे अतोनात हाल केले, या मुलीच्या संपूर्ण शरिरावर जखमा असून बलात्काऱ्यांनी या मुलीचं नाक चावून तोडून टाकलं आहे, यामुळे तिच्या नाकाचे हाड तुटलं असून तिला श्वासही घेता येत नाहीये. श्वास घेण्यासाठी तिच्या नाकात एक ट्यूब टाकण्यात आली आहे. या नराधमांनी तिच्या गुप्तांगातही काठ्या घुसवल्याने तिला जबरदस्त इजा झाली आहे. या मुलीवर गुरुवारी सहा तास शस्त्रक्रीया करण्यात आली आहे’, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आरोपींना फाशी देण्याची मागणी
या घटनेची बातमी परिसरात पसरल्यानंतर संतप्त लोकं रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. लोकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली असू आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना फासावर लटकवावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.