रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचा लोकलमधून प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सीएसएमटी ते दादर लोकलच्या द्वितीय श्रेणीने प्रवास करीत प्रवाशांशी हितगूज केले. त्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. तसेच मध्य रेल्वेच्या पहिल्या संपूर्णपणे महिला संचालित माटुंगा रेल्वे स्थानकाला भेट देऊन महिला स्टाफचा सत्कारही केला.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबईला भेट दिली. सकाळी त्यांनी साडेदहाच्या सुमारास सीएसएमटी ते दादर लोकलने प्रवास करीत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.