लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; आंबा पिकाचे नुकसान

लातूर शहर आणि जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. शनिवारी दुपारी 3 वाजता अचानाक अंधार दाटून आला. शनिवारी दुपारपर्यंत चांगले ऊन पडले होते. तसेच तापमानाचा पाराही चढलेलाच होता. मात्र, अचानक वातावरणात बदल होत वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील पत्रे , कडब्याच्या बनमीवर झाकलेले प्लास्टिक उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

औसा तालुक्यातील ऊटी बू परिसरात सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाला झाली. वादळी वाऱ्यांमुळे काही घरांवरील पत्रे उडाले. शेतातील कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले. तसेच आंबा पिकाचे नुकसानही झाले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. नणंद परिसरात आर्ध्या तासांपासून मेघ गर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला. कासार सिरसी व परिसरात आर्धा तासांपासून मेघ गर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला.