दीड हजारांसाठी दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण केली, नंतर केले भयंकर कृत्य

बिहारमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका दलित महिलेसोबत दीड हजारांसाठी स्थानिक गुंडानी अमानुष कृत्य केल्याची घटना घडली आहे. गुंडांनी महिलेचे कपडे उतरवून तिला मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे संपूर्ण प्रकरण पाटणा जिल्ह्यातील मोसिमपूर गावातील आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी महिलेने गुंडांकडून दीड हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी व्याजासह पैसे परत केले. मात्र गुंडांनी व्याजाच्या नावाखाली आणखी पैसे मागितले. व्याजाचे पैसे देऊनही ते पुन्हा पैसे मागत असल्याने दलित महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गुंडांनी तिच्याशी अतिशय अमानुष वर्तन केले. प्रमोद सिंग आणि त्यांचा मुलगा अंशु कुमार अशी या गुंडांची नावे आहेत. यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री गुंडांनी महिलेला घरातून पळवून नेले. घरात महिला दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांनी महिला विवस्त्र घराच्या दिशेने धावत येत आहे. घरच्यांनी तिला कपड्यात गुंडाळून घरी घेऊन आले.

घरच्यांनी जेव्हा महिलेला घटनेबाबत विचारले त्यावेळी महिलेने आरोपी प्रमोदने तिचे कपडे उतरवले आणि त्याच्या मुलाने तिच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याचे सांगितले. जेव्हा महिला घरी परतली. त्यावेळी महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर तिच्या जांघेवर मारहाणी जखमा आहेत. या घटनेनंतर कुटुंबिय एवढे घाबरले की गाव सोडण्याबाबत विचार करु लागले होते. पोलिसांनी सांगितले की, महिलेने रात्री मारहाणीची तक्रार केली होती, त्यानंतर तिने तिचे स्टेटमेण्ट बदलले आणि प्रमोद सिंह, अंशू आणि अन्य चौघांविरुद्ध एफआयआर दाखल केला. सध्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.