योगींनी केलं नामांकन दाखल, जाणून घ्या किती आहे संपत्ती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूर शहरातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशीलही दिला आहे. यामध्ये त्यांनी 1.54 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री योगी यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1 लाख रोख आहे. यापूर्वी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती 95.98 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत सुमारे 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

या गोष्टींचे मालक आहेत योगी आदित्यनाथ

  • मुख्यमंत्री योगी यांची दिल्ली, लखनौ आणि गोरखपूरमधील 6 ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये 11 खाती आहेत. या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे.
  • मुख्यमंत्री योगी यांच्याकडे जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे 37.57 लाख रुपये आहेत.
  • योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपयांची सोन्याची नाणी आहेत. त्यांचे वजन 20 ग्रॅम आहे. तसेच योगी सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घालतात, ज्याची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे. या साखळीचे वजन 10 ग्रॅम आहे.
  • सीएम योगी यांच्याकडे 12 हजार रुपयांचा मोबाईलही आहे. गेल्या वेळी योगींनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे एकही कार नाही.