घारापुरी बेटावर रंगला फॅशन शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। उरण

भारत सरकारच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने घारापुरी येथे सोमवारी (28) संध्याकाळी भारतरत्न,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर व केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्या प्रमुख उपस्थितीत फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

घारापुरी लेणी परिसरात आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये अनेक विविधरंगी वस्त्रांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी वस्त्रोद्योगा व्यवसाया संदर्भात विविध कंपन्यांसोबत करारही करण्यात आले.

sachin-f

घारापुरी बेटावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर व केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आदी मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य मंगेश आवटे,तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, सखाराम भोईर यांच्यासह मोठ्या प्रमाणात घारापुरी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.