
हिंदुस्थानातील यूएस दुतावासाने नवा विक्रम केला आहे. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान 140,000 विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर करून नवा विक्रम केला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागातर्फे एक अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेमध्ये ” आमच्या हिंदुस्थानातील दुतावासाने 140,000 पेक्षा अधिक व्हिसा जारी केले आहेत, असे सांगितले आहे. यूएस राज्य विभागाने जागतिक स्तरावर 10 दशलक्षाहून अधिक बिगर स्थलांतरित व्हिसा अर्ज जारी केले आहेत.
या व्यतिरिक्त अमेरिकन दुतावासाने व्यवसाय आणि पर्यटनासाठी जवळपास आठ दशलक्ष अभ्यागत व्हिसा जारी केले. जे 2015 नंतर कोणत्याही वित्तीय वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. त्याचबरोबर अमेरिकन दुतावास तसेच वाणिज्य दुतावासांनी 600,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केले आहेत. हिंदुस्थानातील यूएस दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 1.2 दशलक्ष पेक्षा अधिक हिंदुस्थानींनी अमेरिकेचा दौरा केला, ज्यामुळे हिंदुस्थानचे अमेरिकेसोबतचे संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत असल्याचे म्हटले जात आहे.
हिंदुस्थानी नागरिक संपूर्ण जगभरातील सर्व व्हिसा अर्जदारांपैकी 10 टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिनिधित्व करतात, यामधील अर्जदारांपैकी 20 टक्के विद्यार्थी असून रोजगार श्रेणीतील व्हिसा अर्जदारांपैकी 65 टक्के आहेत.


























































