अमेरिकेत पूर, व्हाईट हाऊसमध्ये घुसले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेत पावसाने हाहाकार उडवला असून राजधानी वॉशिंग्टन मध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. सर्वत्र पाणी असल्याने काही जणांनी गाडीच्या टपावरच मुक्काम ठोकला आहे.  पूराचे पाणी व्हाईट हाऊसमध्येही घुसले असून पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अमेरिकेतील वेस्टर्न डीसी, साऊथर्न मोंटगोमेरी, ईस्ट सेंट्रल लौडौन कौंटी,अर्लिग्टन कौंटी, फाल्स चर्च यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून गाड्या चालवणेही चालकाला कठिण झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानात व्हाईट हाऊस मध्येही पाणी घुसले असून तळघरात गुडघाभर पाणी साचल्याचे समजते आहे. येथे वाहणाऱ्या पोटॉमॅक नदीला पूर आल्याने ही परिस्थिती उद्दभवल्याचे बोलले जात आहे.