तिरंगा घेऊन खतरनाक स्टंट, व्हिडीओ व्हायरल होताच एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशातील कानपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही मुलं तिरंगा हातात घेऊन बाईकवर खतरनाक स्टंटबाजी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ गंगा बेराज येथील असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.

कानपूरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त गंगा बॅरेजवर मोठी गर्दी झाली होती. यावेळी अनेक तरुण बाईक घेऊन सहभागी झाले होते. स्टंटबाजी करत होते. त्यातील काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामधील एका व्हिडीओत एक तरुण हिरव्या रंगाच्या बाईकवर तिरंगा लावून धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका स्टंटमनला अटक केली आहे. एवढेच नाही तर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनी बाईकवर नंबर प्लेट लावली नव्हती. तिरंगा घेऊन रस्त्यावर स्टंट करत होते. त्याने तिरंग्याचाही अपमान झाला. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेत कारवाई केली आणि रात्री पोलिसांनी एका काळ्या रंगाच्या पल्सरसोबत तारिक नावाच्या तरुणाला अटक केली.

मात्र तिरंगा घेऊन हिरव्या रंगाच्या दुचाकीवर स्टंटबाजी करणारा तरुण अजूनही मोकाट आहे. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नवाबगंज पोलीस ठाण्यात एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गंगा बॅरेजवर स्टंटबाजी केल्याच्या आरोपावरून तारिकला अटक करून त्याची दुचाकी जप्त करण्यासाठी पोलिसांच्या मीडिया सेलच्या वतीने एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती.