शिमल्याहून हरिद्वारला चाललेली बस कांदाघाटजवळ उलटल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली. या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कांदाघाट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
52 प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये अधिक प्रवाशी भरले होते. बंदी बोगद्याजवळ चालकाचे ओव्हरलोड बसवरील नियंत्रण सुटल्याने कांदाघाटजवळ बस रस्त्यावर उलटली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.