साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vaishali yede prahar janshakti

सामना प्रतिनिधी । यवतमाळ

वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिह्यातील कळम तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून सात वर्षांपूर्वी आपले जीवन संपवले होते. यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन येडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. दरम्यान, दुःखावर मात करत आणि आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबाच्या व्यथा एक नाटकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.