सामना प्रतिनिधी । मुंबई
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीचे प्रमुख सूत्रधार हे तत्कालीन गुजरात एटीएसचे प्रमुख डी.जी. वंझारा आहेत, असा दावा याचिकाकर्ता सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने हायकोर्टात केला. रुबाबुद्दीनच्या वतीने अॅड. गौतम तिवारी यांनी बाजू मांडली. गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी.जी. वंझारा, एम.एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र यातील काही अधिकाऱयांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली होती.


























































