वेरळ तर्फे वेसवीत ग्रामस्थांनी बांधले श्रमदानातून बंधारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेरळ तर्फे वेसवीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून 3 बंधारे बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली आहे. मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे वेसवी या गावातून वाहणाऱ्या एका नदिवर वेरळ तसेच कबरगाणी ग्रामस्थांनी पोफळीचा डोव्ह, डुऱ्याजवळ आणि पुलाच्या खाली अशा 3 ठिकाणी वनराई पद्धतीचे बंधारे उभारून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना राबविली आहे.

उमरोली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आणि वेरळ येथील ग्रामस्थ दीपक बोर्ले यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत सदस्या स्नेहा बोर्ले, कृषी सेवक कुंभार तसेच वेरळ येथील ग्रामस्थ आणि महिलांनी त्याचबरोबर कबरगाणी येथील ग्रामस्थांनी मिळून बंधारे बांधण्याचे काम केले. बंधारे उभारण्यासाठी 40 स्त्री पुरुषांनी मिळून श्रमदान केले. नदीचे वाहून जाणारे पाणी हे बंधारे बांधून अडविल्यामुळे वेरळातील विहिरींच्या पाण्याची पातळी तर वाढणार आहे शिवाय या अडवलेल्या पाण्याचा उपयोग हा खासकरून मौन जातीला पाणी पिण्यासाठी होणार आहे. वेरळ आणि कबरगाणी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांच्या कामाचे सर्व स्तरांतून ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.