
ज्येष्ठ शिवसैनिक रत्नाकर चव्हाण (79) यांचे आज अल्पशा आजाराने सांताक्रूझ येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. चव्हाण हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पर्ह्ट शाखेत कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी एका गुजराती बँकेत स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना करून असंख्य मराठी तरुणांना बँकेत नोकरीला लावले. लोकाधिकारच्या अध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती.































































