करमबीर सिंह होणार नवे नौदल प्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांची नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा हे 31 मे 2019 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्याकडून करमबीर सिंह हे नौदल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारतील. करमबीर सिंह हे सध्या पूर्व नौदल कमांडचे कमांडर वाईस अॅडमिरल व फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत.

करमबीर हे जुलै 1980 मध्ये नौदलात भरती झाले. गेल्या 39 वर्षांपासून ते नौदलात कार्यरत आहेत. 1982 मध्ये ते हेलिकॉप्टर पायलट देखील बनले. त्यानंतर त्यांनी चेतक व कामोव हे हेलिकॉप्टर देखील चालवले.