विदर्भाच्या ‘पोट्टय़ा’चा टी–20त अनोखा विक्रम ; दोन्ही हातांनी गोलंदाजी; चारही षटके मेडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय कर्णेवारने पुन्हा एकदा अफलातून कामगिरी केली आहे. अक्षय सध्या शानदार गोलंदाजी करत आहे. मणिपूरनंतर अक्षयने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात 4 षटकांत 5 धावा देत 4 बळी घेतले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱया अक्षयने आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

सोमवारी विजयवाडा येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अक्षय कर्णेवारने मणिपूरविरुद्ध चार षटकांच्या कोटय़ात एकही धाव दिली नाही. सर्व चार षटके मेडन टाकण्याचा विक्रम अक्षय कर्णेवारच्या नावावर आहे. यासह टी -20 फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

अक्षय कर्णेवारने  4 षटके मेडन टाकत 2 विकेट घेतल्या. हा विक्रम टी -20 आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचाइजी टी-20 क्रिकेटमध्येही पुणाला साकारता आलेला नाही.