विक्रम गोखले यांच्या कसदार अभिनयाची झलक ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा लक्षवेधी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> सुहासिनी मुळय़े

लवकरच ‘सूर लागू दे’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या अभिनयाने सर्व माध्यमे व्यापून टाकणारे विक्रम गोखले यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा ‘सूर लागू दे’ हा चित्रपट खऱया अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहणारा ठरणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘सूर लागू दे’च्या उत्कंठा वाढवणाऱया टीझरचे कौतुक होत आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी यात पाहायला मिळणार असल्याचे टीझरवरून जाणवते. अभिनेत्री रीना मधुकर हिने साकारलेल्या व्यक्तिरेखेचीही झलक टीझरमध्ये आहे. ‘कलियों का चमन…’ फेम मेघना नायडू या चित्रपटात एका सरप्राईज पॅकेजच्या रूपात दिसणार आहे. ही ऑडबॉल मोशन पिक्चर्सची निर्मिती असून दिग्दर्शन प्रवीण बिरजे यांचे आहे.

‘सूर लागू दे’ ही नातेसंबंधांची गोड कथा आहे. एक महान आणि अतिशय प्रिय कलाकार विक्रम गोखले यांचा दुर्दैवानं हा शेवटचा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाचं शेवटचं शेडय़ूल सुरू होण्यापूर्वी विक्रमजींनी मला फोन केला. ते म्हणाले की, मला माझं कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही. त्या नाजूक परिस्थितीतही त्यांनी 14-14 तास काम करून ‘सूर लागू दे’चं शूटिंग पूर्ण केलं. विक्रमजींचे उत्कृष्ट काम आणि  चांगले कथानक यासाठी हा चित्रपट बघावा.