
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालकोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत कुरार व्हिलेज मनपा इंग्रजी शाळेच्या तपेटा गुल्लू नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव स्पर्धेत टी विभागातून कुपारी, जी-एस विभागातून आदिवासी ढेमसा नृत्य, ए विभागातून कर्कट्टम नृत्य, सी विभागातून नागा नृत्य, एच-पश्चिम विभागातून आसामी बिहू नृत्य, पी-एन विभागातून तपेटा गुल्लू नृत्य, एम-पूर्व वन विभागातून होजागिरी नृत्य व आर, एस विभागातून भोजाली नृत्य अशा आठ लोकनृत्यांचे सादरीकरण अंतिम फेरीत करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ यांच्या हस्ते झाले.
अंतिम निकाल
- कुरार व्हिलेज पालिका इंग्रजी शाळा-तपेटा गुल्लू नृत्य – प्रथम क्रमांक.
- डोंगरी मनपा मराठी शाळा, भोजाली नृत्य, दुसरा क्रमांक.
- देवनार पालिका इंग्रजी शाळा क्रमांक दोन, होजगिरी नृत्य, तृतीय क्रमांक.


























































