रामदास आठवले यांच्या सभेत गोंधळ, खुर्च्यांची फेकाफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर 

नामविस्तार दिनानिमित्त संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारिपचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करण्यात आल्यामुळे उपस्थितांनी गोंधळ घातला. खुर्च्यांची फेकाफेक करत तोडफोड करण्यात आली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.