पेट्रोल भरताना घ्या या गोष्टीची काळजी; पाहा व्हिडीओ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल भरताना तुम्ही केवळ मीटरवर लक्ष ठेवता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. @byomkesbakshy या नेटकऱ्याने 23 नोव्हेंबर रोजी पेट्रोल पंपाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात पेट्रोल पंपवरील दोन कर्मचारी पेट्रोल भरताना नोजलला आपसात असे बदलतात की याचा दुचाकी चालकांना सुतराम पत्ता लागत नाही.

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगत आहेत, तर काही लोक हा व्हिडीओ पाहून हा प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोल पंपचे कर्मचारी असं करून ग्राहकांकडून पैसे पूर्ण घेतात. मात्र पेट्रोल कमी भरतात, असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे.