तहानलेल्या माकडाला बॉटलने पाजलं पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा पारा वाढल्यामुळे जंगलात वावरणाऱया प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. अशातच एका व्यक्तीने चक्क आपल्या बाटलीने तहानलेल्या माकडांना पाणी पाजले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 45 सेकंदांच्या या व्हिडीओत एक तहानलेलं माकड या व्यक्तीजवळ येऊन बसतं. त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याजवळील बाटलीने त्याला पाणी पाजलं. त्याच वेळी दुसरा माकड येतो. जो त्या व्यक्तीकडून पाण्याची बाटली हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण तो माणूस त्याला बाटली न देता दोन्ही माकडांना पाणी पाजताना दिसतोय.