Vivo चा 48 मेगा पिक्सल कॅमेरा असलेला Y72 5G मोबाईल लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवोने नुकतंच आपला Vivo Y72 5G हा मोबाईल लॉन्च केला आहे. विवोचा Y सीरीजमधी 5Gचा पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमधी विशेष फीचर म्हणजे याचा कॅमेरा 48 मेगापिक्सल इतका आहे. तसेच 8 जीबीचा रॅम असून 4 जीबीचा व्हर्च्युअल रॅमचाही समावेश आहे. त्यामुळे फोन आणखी फास्ट होणार आहे.

या फोनची युएसबी सी टाईप आहे. फोनचे वजन 185 ग्राम इतके आहे. फोनमध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम 11 अँड्रॉईड आहे. फोनमध्ये क्वालाकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर असून 8 जीबीचा रॅम आहे. तसेच इंटर्नल मेमरी 128 जीबी इतकी आहे. तसेच फोनमध्ये 4 जीबीचा व्हर्च्युअल रॅमही आहे. व्हर्च्युअल रॅममुळे फोन फास्ट चालणार आहे तसेच मेमरी क्लिनिंगच्या मेसेजपासून युजरची सुटका होणार आहे.

कॅमेरा

फोनमध्ये ड्युअर रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून दुसरा फोन 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनची किंमत

हिंदुस्थानमध्ये या फोनची किंमत 20 हजार 990 इतकी आहे. 15 जुलै पासून या फोनची विक्री ऑनलाईन सुरू झाली आहे. HDFC, ICICI आणि Kotak banksच्या क्रेडिट कार्ड धारकांना दीड हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळत आहे.