
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईमध्ये बुधवारी दुपारी अचानक व्होडाफोनचे नेटवर्क बंद झाल्याने ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. कोट्यवधी ग्राहकांच्या मोबाईलच्या नेटवर्कच्या दांड्या गायब झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्कमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रॉब्लेम झाल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी व्होडाफोनच्या नेटवर्कमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. त्यावेळी देखील ग्राहकांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते असे समजते.

























































