प्लिस्कोवाकडून अझारेन्का पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

सातवी सीडेड कॅरोलिना फ्लिस्कोवा हिने व्हिक्टोरिया अझारेन्काला ६-३, ६-३ अशा फरकाने हरवून विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत तिसऱया फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या तिसऱया फेरीत पोहचण्याची ही पहिलीच खेप ठरली. महिला एकेरीच्या अन्य लढतीत किकी बर्टेन्स, व्हीनस विल्यम्स, इ. रोडिना, डोना वेकीच यांनीही प्रतिस्पर्ध्यांना हरवून आगेकूच केली.

फेडरर सुसाट
दरम्यान, स्वित्झर्लंडचा अनुभवी आणि दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने लुकास लॅको याला सरळ तीन सेटमध्ये हरवून पुढे पाऊल टाकले. पुरुष एकेरीत सॅम क्वेरी, गेल मॉनफिल्सनेही कूच केली.