
सामना ऑनलाईन। कोल्हापूर
कोल्हापुरच्या तिलारी नजीक असलेल्या कोदाळी येथील सूर्यास्त पॉईंट उर्फ लष्कर पॉईंटवरून दरीत कोसळून बेळगाव येथील ५ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी हे युवक आले होते. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस व कोदाळीचे ग्रामस्थ करीत आहेत. मृतांची नावे पुढीलप्रमाणे-
१.पंकज उर्फ ज्योतिर्लिंग संपत किल्लेदार (रा. शिवाजीनगर बेळगाव)
२. मोहन लक्ष्मण रेडेकर (रा. बाळेकुंद्री बेळगाव)
३. किशन मुकुंद गावडे (रा. जुने बेळगाव)
४. यल्लाप्पा एन पाटील (रा. बोकनुर बेळगाव)
५. नागेंद्र सिंद्राय बाबुगावडे (रा. आष्टी बेळगाव)

































































