तरुणाईत विठूचा फिवर; डोक्यावर विठ्ठल आणि संतांच्या प्रतिकृती कोरण्याचा ट्रेंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

वारकऱ्यांची गर्दी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे. भक्तिमय वातावरणाचा हा फिवर तरुणांमध्येही दिसत आहे. डोक्यावर केसांमध्ये श्री विठ्ठलाची प्रतिमा करून विठूमाऊलीप्रति असलेली आपली भक्ती तरुण व्यक्त करत आहेत. पंढरपूरमधील नाभिक तुकाराम चव्हाण सध्या याच कामात गुंतले आहेत.

तरुणांमध्ये वेगवेगळ्या हेअरस्ट्राईलची नवीन फॅशन येत आहे. या फॅशनमध्ये आता आणखी भर पडली आहे. डोक्यावर श्री विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदींसह वारकरी संप्रदायाशी निगडित कलाकृती तरुण आपल्या डोक्यावर कोरून घेत आहेत. वारकरी संप्रदाय आत्मसात करून त्याचे आचरण करणे कठीण असले तरी तरुणवर्ग संप्रदायाकडे आकर्षित होतोय आणि डोक्यावर अशा कलाकृती कोरून घेत आहेत.