फेसबुकचा मार्क झुकेल बघ! 34 हजार कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

डेटाचोरी प्रकरणात अमेरिकेच्या रेग्युलेटर फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) फेसबुकला तब्बल पाच अब्ज डॉलर म्हणजेच 34 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस अमेरिकेच्या विधी विभागाकडे केली आहे. समाजमाध्यमांमधील एखाद्या टेक कंपनीवर करण्यात येणारी आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरणार आहे.

याआधी 2012 मध्ये गुगलला 154 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अमेरिकेचा विधी विभाग याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. मार्च 2018 मध्ये फेसबुकवरून डेटाचोरी होत असल्याबाबतचे एक मोठे प्रकरण उघड झाले होते. फेसबुक यूजर्सच्या डेटाच्या सुरक्षेबाबत फेसबुकने हलगर्जीपणा केल्याचे समोर आले होते.