भविष्य-रविवार 17 ते शनिवार 23 मार्च 2019

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलिमा प्रधान

मेष
लोकप्रियता वाढेल
मेषेच्या एकादशात शुक्र, पराक्रमात राहू, सप्तमात केतू, वृषभेत मंगळ यांचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात चांगला जम बसेल. नवा फंडा उपयोगी येईल. राजकारणात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक कार्याची लोकप्रियता मात्र वाढेल. लोकांना तुमच्यावर विश्वास वाटेल.
शुभ दि. 19, 20.

वृषभ
योजनांकडे लक्ष द्या
वृषभेच्या दशमेषात शुक्र, धनेषात राहू, अष्टमेषात केतू स्वराशीत मंगळ राश्यांतर होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही योजनांवर अधिक लक्ष द्या. प्रतिष्ठा राहील. व्यवसायात काम मिळेल. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा. कलाक्षेत्रांत चांगले काम कराल. नोकरीत नवी संधी मिळेल.
शुभ दि. 17, 18.

मिथुन
परदेश गमनाची संधी
मिथुनेच्या नवमेषात शुक्र, वृषभेत मंगळ, स्वराशीत राहू, सप्तमेषात केतू येत आहे. राजकीय क्षेत्रात तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. व्यवसायात तुमच्या बुद्धिचातुर्याने फायदा होईल. नव्या विचाराने प्रगती करता येईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. परदेशात नोकरीसाठी जाण्याची संधी मिळू शकते.
शुभ दि. 18, 19

कर्क
निर्णयात सावधगिरी बाळगा
कर्केच्या अष्टमेषात शुक्र, व्ययेषात राहू, षष्टेषात केतू, वृषभेत मंगळ येत आहे. व्यवसायात मोहाचे क्षण येतील. सावधपणे निर्णय घ्या. कामगारांच्या व्यथेचा विचार करा. राजकीय क्षेत्रात तुमची योजना प्रसिद्धीस येईल. होळीमध्ये अहंकार, राग यांना सोडून द्या. नव्या उमेदीने तुमच्या क्षेत्रात पुढे जा.
शुभ दि. 18, 19

सिंह
अहंकाराला दूर ठेवा
सिंह राशीच्या सप्तमेषात शुक्र एकादशात राहू, पंचमेषात केतू, वृषभेत मंगळ राश्यांतर होत आहे. राजकारणात मोठे नेते तुमच्यावर टीका करतील. सामाजिक क्षेत्रात लाकांना तुमची मते पटवून देता येतील. नीटपणे नियोजन करा. अहंकाराची भावना ठेवल्यास मागे राहाल. वैयक्तिक प्रश्न सोडवाल.
शुभ दि. 22, 23

कन्या
समस्यांवर मार्ग शोधा
कन्येच्या शष्ठेषात शुक्र, दशमेषात राहू, सुखस्थानात केतू, वृषभेत मंगळ यांचे राश्यांतर होत आहे. राजकारणात दिग्गज नेते तुमचे कौतुक करतील. कोणालाही कमी समजू नका. सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न होईल. व्यवसायात समस्या येईल. कुटुंबात नाराजी होईल. तुमच्या चुका मुले दाखवतील.
शुभ दि. 22, 23

तूळ
संधीचे सोने करा
प्रगतीकारक काळ कायम सोबत राहत नाही. ती संधी फार थोडा काळ असते. त्यामुळे सज्ज राहा. तुलेच्या पंचमेषात शुक्र, भाग्येषात राहू, पराक्रमात केतूचे, वृषभेत मंगळाचे राश्यांतर होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कटू घटना घडू शकते. व्यवसायात मोठे काम मिळेल. नोकरीत कामाचा व्याप राहील.
शुभ दि. 17, 18

वृश्चिक
व्यवसायाला कलाटणी मिळेल
वृश्चिकेच्या सुखेषात शुक्र प्रवेश, वृश्चिकेच्या अष्टमेषात राहू, धनेषात केतू, वृषभेत मंगळ येत आहे. व्यवसायाला वेगळीच कलाटणी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे पाऊल पडेल. अनुभवी लोकांचा दृष्टिकोन समजून घ्या. व्यावहारिक धोरण ठेवा. विरोधकांना कमी लेखू नका.
शुभ दि. 17, 18

धनु
नव्या कार्याचा आरंभ कराल
नव्या उत्साहाने, जिद्दीने तुम्ही तुमच्या आकाशात नवा सूर्य उगवू शकाल. खंबीर राहा. भिडस्तपणा ठेवू नका. संधीचा फायदा घ्या. धनु राशीच्या पराक्रमात शुक्र, सप्तमेषात राहू, स्वराशीत केतूचे, वृषभेत मंगळ राश्यांतर होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवे कार्य आरंभ करा. कलाक्षेत्रांत चमकाल. शुभ दि. 22, 23

मकर
आत्मविश्वास वाढेल
क्षेत्र कोणतेही असो, तुमच्यापासून दूर गेलेल्या लोकांना तुमचे पुन्हा नव्याने आकर्षण वाटेल. व्यवसायात मोठा निर्णय घेता येईल. मकरेच्या धनेषात शुक्र, षष्टात राहू, व्ययेषात केतूचे, वृषभेत मंगळाचे राश्यांतर होत आहे. नव्या विचारांची प्रेरणा मिळेल. आत्मविश्वासाने नवी झेप घ्याल. ध्येय गाठा. कलाक्षेत्रांत यश मिळेल.
शुभ दि. 17, 18

कुंभ
प्रगतीकारक काळ
स्वराशीत शुक्र, कुंभेच्या पंचमेषात राहू, एकादशात केतूचे राश्यांतर होत आहे. वृषभेत मंगळ येत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार ज्वलंत वाटतील. तुम्हाला मिळणार मानसन्मान लोकप्रियता वाढेल. व्यवसायात न पाहिलेले स्वप्न पूर्ण करू शकाल. घर, वाहन, वास्तू खरेदीचा विचार होईल. शुभ दि. 22, 23

मीन
मतभेद होतील
मीनेच्या व्ययेषात शुक्र, मीनेच्या चतुर्थात राहू, दशमात केतू वृषभेत मंगळ येत आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी उद्योग-धंद्यात, कुटुंबात मतभेद होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जिद्द बाळगा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कलाक्षेत्रांत प्रगतीची संधी मिळेल. तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा.
शुभ दि. 17, 18