साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 10 ते शनिवार 16 एप्रिल 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – डावपेच प्रभावी ठरतील

मेष राशीच्या व्ययेषात म्हणजे मीनेत 10 एप्रिल रोजी गुरू प्रवेश करेल. स्वराशीत सूर्य राश्यांतर. संभ्रमात टाकणारा प्रश्न सोडवावा लागेल. व्यवसायात नवे धोरण ठरवता येईल. तणावाचे प्रसंग निर्माण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच प्रभावी ठरतील. शुभ दिनांक : 12, 13

वृषभ – कायद्याच्या कक्षा पाळा

मीन राशीत गुरू महाराज प्रवेश करतील. वृषभेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर. उत्साह, आत्मविश्वास टिकून राहील. कायद्याच्या कक्षा पाळा म्हणजे समस्या वाढणार नाहीत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. अहंकाराची भावना दूर ठेवून वक्तव्य करा. शुभ दिनांक :10, 11

मिथुन – प्रत्येक दिवस उत्कर्षाचा

मीन राशीत प्रवेश करणारा गुरू तुमच्या कार्याला नवी दिशा देणारा ठरेल. मिथुनेच्या एकादशात सूर्य राश्यांतर. प्रत्येक दिवस उत्कर्षाचा ठरेल. नोकरी-धंद्यात मनाप्रमाणे प्रगती साधाल. कर्जाचे काम मार्गी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणींवर मात करून वर्चस्व सिद्ध करता येईल. शुभ दिनांक : 10, 11

कर्क – कामाचा प्रभाव वाढेल

मीन राशीत प्रवेश करणारे गुरू महाराज तुमच्या समस्या कमी करतील. कर्केच्या दशमेषात सूर्य राश्यांतर. तुमच्या अडचणी कमी होऊन नव्या दिशेने वाटचाल कराल. प्रगतीकारक घटना घडेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचा प्रभाव वाढेल. शुभ दिनांक : 15, 16

सिंह – अहंकार दूर ठेवा

मीन राशीत गुरूचे आगमन होत आहे. सिंहेच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. धंद्यात लाभदायक घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आठवडय़ाच्या सुरुवातीला तणाव राहील. चिंताजनक समस्या निर्माण होईल. शुभ दिनांक :12, 13

कन्या – गुंतवणुकीत सावध राहा

मीन राशीत गुरूचे आगमन दिशादर्शक ठरणार आहे. कन्येच्या अष्टमात सूर्य राश्यांतर. घाईने कोणतेही वक्तव्य करू नका. गुंतवणुकीत सावध राहा. मौल्यवान वस्तू सांभाळा. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेवर टीका होईल. कायद्याला कमी लेखू नका.
शुभ दिनांक : 15, 16

तूळ – खरेदी-विक्री व्यवहारात फायदा

तुळेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, मीनेत गुरू ग्रहाचा प्रवेश होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. शुक्रवार, शनिवार चूक होणार नाही याकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. शत्रूला कमी लेखू नका. खरेदी-विक्री व्यवहारात फायदा होईल. शुभ दिनांक :10, 12

वृश्चिक – प्रतिस्पर्धी वाढतील

मीन राशीत गुरू प्रवेश, वृश्चिकेच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर. संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. व्यवसायात नम्रता ठेवा. चांगले संबंध बिघडवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे प्रतिस्पर्धी वाढतील. प्रवासात सावध राहा. मैत्रीत तणाव, गैरसमज होतील. कोर्टाच्या कामात सतर्क राहा. शुभ दिनांक : 10, 15

धनु – विरोधक त्रास देतील

मीन राशीत गुरू प्रवेश, धनुच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर. आठवडय़ाच्या सुरुवातीला मन अस्थिर होईल. व्यवसायात फायदेशीर योजनांचा विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. विरोधक त्रास देण्याची संधी सोडणार नाहीत. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहील. शुभ दिनांक :12, 15

मकर – किरकोळ समस्या येतील

मीन राशीत गुरू ग्रहाचा प्रवेश, मकरेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर. रागावर ताबा ठेवा. कोणतेही वक्तव्य करताना नीट विचार करा. नोकरीत किरकोळ समस्या येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला वेगाने पुढे न्या. कौटुंबिक प्रश्न सोडवाल. खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होईल. शुभ दिनांक : 10, 11

कुंभ – प्रवासात सावध राहा

मीन राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह तुमच्या हिताचा ठरेल. कुंभेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर. या आठवडय़ात तुमचे धाडस, उत्साह वाढणार आहे. प्रवासात सावध राहा. इतरांना मदत करताना घाई करू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मान, प्रतिष्ठा वाढेल. भावनेच्या आहारी न जाता प्रश्न सोडवा.शुभ दिनांक : 12, 13

मीन – आशादायक वातावरण

स्वराशीत गुरूचे राश्यांतर, धनेषात सूर्य राश्यांतर तुमच्या कार्याला साहाय्य करेल. गुंतवणुकीची घाई नको. धंद्यात फसगत टाळा. नोकरीत वर्चस्व सिद्ध करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आशादायक वातावरण निर्माण होईल. स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे ठरेल. खरेदीची घाई नको. शुभ दिनांक : 15, 16