
कोरोनामुळे गेल्या सोळा महिन्यांपासून बंद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील 8 वी ते 12 वीच्या शाळांची आज घंटा वाजली. कोरोनाचे काटेकोर नियम पाळून कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू झाल्या आहेत. सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आज कोल्हापुरातील 940, नगर 205, सोलापूर 211 आणि सांगली जिह्यातील 20 शाळा सुरू झाल्या आहेत. प्रशासनाकडून कोणत्याही सूचना न आल्याने साताऱयातील शाळा बंदच आहेत.
नगरमध्ये 205 शाळांत वाजली घंटा
कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. आज पहिल्या दिवशी जिह्यातील 205 शाळा सुरू झाल्या. महिनाभरापासून कोरोनामुक्त गावांत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समितीचा ठराव घेऊन पालकांच्या लेखी संमतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापुरात पहिल्याच दिवशी 12 हजार 345
कोरोनामुळे गेल्या सोळा महिन्यांपासून बंद असलेल्या 8 वी ते 12 वीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. जिह्यात जवळपास 211 शाळा सुरू असून नव्वद टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. पहिल्या दिवशी साठ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. जवळपास 12 हजार 345 विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी हजेरी दिली. जिह्यात तब्बल 637 गावे कोरोनामुक्त आहेत. बोरामणी येथील शाळेत मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुलांचे स्वागत केले.
कोल्हापुरात 940 शाळांत 1 लाख 55 हजार विद्यार्थी
जिह्यात एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यातील इतर जिह्यांपेक्षा अधिक असतानाही जिह्यात पालकांच्या संमतीने माध्यमिक शाळा सुरू झाल्याचे समाधानकारक चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर जिल्हय़ातील सुमारे 940 माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी सुमारे 1 लाख 55 हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला. विशेष म्हणजे सुरू झालेल्या सर्वच शाळा या ग्रामीण भागातील आहेत.
































































