रत्नागिरीत जाकिमिऱ्या किनाऱ्यावर अवाढव्य मृत व्हेल मासा, बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीत जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी अवाढव्य व्हेल मासा मृतावस्थेत सापडला आहे. मृत पावलेला व्हेल मासा समुद्राच्या पाण्याबरोबर जाकिमिऱ्या पाटीलवाडी किनाऱ्याजवळ आला.

आज सकाळी काही ग्रामस्थांना हा मासा किनाऱ्यावर दिसला.हि बातमी गावात पसरताच अवाढव्य व्हेल मासा पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. साधारण पस्तीस ते चाळीस फूट लांबीचा हा व्हेल मासा आहे.