देशभरातील मतदारांशी संपर्क; फेसबुक, व्हॉट्सअॅपवर 87 हजार ग्रुप अॅक्टिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष मतदारांशी संपर्क साधण्यासाठी ‘व्हॉटस्अॅप’ आणि ‘फेसबुक’च्या तब्बल 87 हजार ग्रुपच्या माध्यमातून झटत आहेत, असे एका अहवालातून बाहेर आले आहे. फेब्रुवारीत ‘व्हॉटस्अॅप’ने प्रसृत केलेल्या एका अहवालानुसार हिंदुस्थानात दर महिन्याला 20 कोटी यूजर्स व्हॉटस्अॅपचा वापर करतात. सोशल मीडियाने गेल्या दोन वर्षांत यूजर्सच्या संख्येबाबत अशी माहिती पहिल्यांदाच दिली आहे.

अर्थात व्हॉटस्अॅपने दिलेली यूजर्सची आकडेवारी (20 कोटी) ही खरी असण्याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जाते. कारण हिंदुस्थानात आजघडीला स्मार्ट फोन यूजर्सची संख्या 43 कोटी झालेली आहे. ती संख्या आणि कुटुंबातील जवळपास सर्वच घटक व्हॉटस्अॅपचा करीत असलेला वापर लक्षात घेता यूजर्सचा खरा आकडा प्रत्यक्षात मोठा असू शकतो.

व्हॉटस्अॅपच्या एका ग्रुपमध्ये 256 यूजर्स सहभागी असतात. n 87 हजार ग्रुपच्या माध्यमातून 2 कोटींच्या वर यूजर्सशी संपर्क साधता येतो. n प्रत्येक व्हॉटस्अॅप यूजरने आपला मेसेज पाच ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला तर मोठय़ा प्रमाणात तो यूजर्सपर्यंत पोहोचतो.

फेक न्यूज रोखणारे फिचर आले
व्हॉटस्अॅपने ‘फेक न्यूज’चा फैलाव रोखण्यासाठी एक नवीन फिचरही आणले आहे. त्या माध्यमातून फेक न्यूज रोखता येते, असे व्हॉटस्अॅप इंडियाचे हेड अभिजित बोस यांनी सांगितले.

राजकीय पक्ष ‘फेसबुक’ आणि ‘यू टय़ूब’च्या माध्यमातून ‘प्रेस मीट’ आणि टीव्ही डिबेटस् करून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्याद्वारे हिंसाचाराला उत्तेजन देणाऱया बातम्या, देशभक्ती आणि हिंदू राष्ट्रवादच्या नावाखाली होणारा प्रचार, सरकारी धोरणांशी संबंधित खोटी आकडेवारी फैलावली जात आहे.
– अनुप मिश्रा, सोशल मीडिया तज्ज्ञ