
सून चार महिन्यांची गरोदर मात्र तिच्या पोटातील मूल हे आपल्या मुलाचे नसून आपल्या पतीचे असल्याचा संशय त्या महिलेला होता. त्यावरून ती सतत सुनेला जाब देखील विचारत होती. त्यावरून वैतागलेल्या सुनेने सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनेला अटक केली आहे.
वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
निकीत अगरवाल असे त्या सुनेचे नाव असून ती मुळची राजस्थानमधील बीवअर गावाची होती. निकीताचे वर्षभरापूर्वी दिपक अगरवाल सोबत लग्न झाले होते. दिपक त्याची पत्नी व आई वडिलांसोबत अहमदाबादमधील गोटा परिसरात राहायचा. दिपकच्या लग्नानंतर निकीता व त्याची आई रेखा यांच्यात खटके उडायचे.
सासऱ्यांशी पटायचे त्याचा यायचा राग
मात्र निकीताचे तिच्या सासऱ्यांसोबत चांगले पटत होते. अशातच निकीताच्या सासूला तिचे सासऱ्यांसोबत अफेयर असल्याचा संशय होता. दरम्यान निकीता गरोदर राहिल्यानंतर सासूला ते मूल सासऱ्याचे असल्याचा संशय होता. त्यावरूनही निकीता व सासूमध्ये कुरबुरी व्हायच्या.
डोक्यात घातला लोखंडी रॉड
गुरुवारी निकीताचा पती दिपक कामाला निघून गेल्यावर पुन्हा तिचे व सासूचे भांडण झाले. निकीताच्या सासरे आजारी असल्याने ते रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या दोघीच घरात होत्या. त्यावेळी संतापाच्या भरात निकीताने घरातील लोखंडी रॉडने सासूच्या डोक्यात आघात केला. या हल्ल्यात त्यांचा मेंदू बाहेर आल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.






















































