एका महिलेने तिच्या अंर्तवस्त्रातील फोटोसोबतच तिचा न्यूड फोटो फॅमिली ग्रुपवर शेअर केल्याने एकच गोंधळ उडाला होता. बेथनी मार्गोरेट असे त्या महिलेचे नाव असून तिने नुकताच एका वेबसाईटवर तिचा हा अनुभव शेअर केला आहे. या तिच्या मुलाखतीचे व्हि़डीओ अमेरिकेत व्हायरल झाले आहेत.
मी माझ्या मैत्रिणीसोबत बिकीनी घ्यायला मॉलमध्ये गेले होते. जवळपास सात आठ बिकीनी घेतल्यानंतर आम्ही तेथून निघालो. माझ्या घरी जाऊन मी त्या सर्व बिकीनी घालून पाहणार होते. माझी मैत्रिण मला त्या कशा दिसत आहेत याबाबत सांगणार होती. मात्र माझ्या मैत्रिणीला एक महत्त्वाचं काम आल्याने ती निघून गेली. मात्र तिने मला सर्व बिकीनी घालू फोटो पाठवायला सांगितले. त्यानंतर मी घरी जाऊन बिकीनीतले माझे फोटो काढले. ते तिला पाठवत असताना चुकून एक दोन फोटो माझ्या फॅमिली ग्रुपवर गेले. सोबतच माझ्या मोबाईलमधील एक न्यूड फोटो देखील त्या ग्रुपवर गेला. मला त्याबाबत माहितच नव्हते. मी बिकीनी सुंदर दिसत असल्याने थोडी हवेतच होते. त्यामुळे मला माझी चूक लक्षात आली नाही. त्यानंतर काही वेळाने माझ्या भावाने मला फोन करून पहिला ग्रुपमधले फोटो डिलीट कर असे सांगितले. मला सुरुवातीला काही समजलेच नाही. मात्र नंतर मी जेव्हा व्हॉट्सअॅप पाहिले तेव्हा मला धक्का बसला असे बेथनीने सांगतिले.
‘मी जेव्हा ते फोटो डिलीट केले तोपर्यंत माझ्या काही भावंडांनी व वहिनींनी ते पाहिले होते. त्यामुळे मला अगदी लाजल्यासारखे झाले. मात्र माझं नशीब चांगले होते की तिच्या वडिलांनी ते फोटो बघितले नव्हते. त्यामुळे मी वाचले’, असे बेथनीने सांगितले.

























































