महिला वन कर्मचाऱयांची एकही तक्रार येता कामा नये, यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला आदेश

महिला वन कर्मचाऱयांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. यापुढे महिला वन कर्मचाऱयांची एकही तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट आदेश राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिली.

मेळघाटातील महिला वन कर्मचाऱयांना काम करताना येणाऱया अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वन कर्मचाऱयांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढवले.

आपली प्रतिक्रिया द्या