
सामना ऑनलाईन, नागपूर
प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी महिलेला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. रश्मी पौनीकर (25, रा. कुंदनलाल गुप्तानगर)असे या महिलेचे नाव आहे. तिचा प्रियकर प्रज्वल रंजीत भैसारे (21, रा. म्हाडा वसाहत, नारी रोड) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. शेखर रमेश पौनीकर (29) असे मृतकाचे नाव आहे. तो महाल येथील सत्यम मॉल येथे एका कपड्याच्या दुकानात कामाला होता.
रश्मीचे लग्नापूर्वी एकाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तिचे प्रियकरासोबतचे संबंध कायम होते. शेखरला ही गोष्ट कळाल्यानंतर तिने त्याची माफी मागितली आणि आपण परत अशी चूक करणार नाही असं आश्वासन दिलं. यानंतरही रश्मीच्या स्वभावात सुधारणा झाली नाही. तिचे फेसबुकवरून प्रज्वलशी लफडं जुळलं. दोघे नियमितपणे भेटत होणे आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. त्यांच्या लग्नात शेखरचा अडसर येत असल्याने दोघांनी त्याचा खून करण्याचं ठरवलं.
शेखरला तुटपुंजा पगार मिळत होता आणि त्याला दारू – जुगाराचे व्यसन होते. शेखर बाहेर पैसे उडवत असल्याने रश्मीला तिचे शौक पूर्ण करता येत नव्हतेत्यामुळे तो रश्मीचे शौक पूर्ण करू शकत नव्हता. यामुळे रश्मी वैतागली होती. रश्मीला ‘क्राइम पेट्रोल’ बघून नवऱ्याला ठार मारण्याची कल्पना सुचली होती. तिने प्रज्वलच्या मदतीने पतीचा गळा आवळला, ब्लेडने हाताची नस कापली नंतर दगडाने डोके ठेचून पतीचा खून केला. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. यानंतर अवध्या चार तासात पोलिसांनी या दोन्ही आरोपींना शोधून त्यांना अटक केली.



























































