महिला प्रीमियर लीग; गुजरात जायंटस् – मुंबई इंडियन्स यांच्यात सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) सलामीचा सामना गुजरात जायंटस् आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. येत्या 4 मार्चपासून सुरू होणारी डब्ल्यूपीएल 26 मार्चपर्यंत रंगेल. 23 दिवस चालणाऱया या स्पर्धेत 22 सामने खेळले जाणार असून सर्व सामने ब्रेबर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर होतील. चार दिवस प्रत्येकी दोन-दोन सामने खेळविले जातील.

दुपारी साडेतीन वाजता पहिला तर रात्री साडेसात वाजता दुसरा सामना खेळविला जाईल. स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंटस्, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली पॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स हे पाच संघ 20 साखळी सामने खेळतील. साखळीतील दुसऱया आणि तिसऱया स्थानावरचा संघ एलिमिनेटर सामन्यात एकमेकांशी भिडतील आणि त्यानंतर साखळीतील अव्वल संघाशी त्यांची अंतिम लढत रंगेल. काल झालेल्या लिलावात 5 संघांसाठी 448 खेळाडूंपैकी 87 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे