
कॅरममधील महिला खेळाडूंचा सहभाग वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ठाणे जिल्हा कॅरम संघटना आणि आर्यन इन्स्टिटय़ूट ऑफ चेस एक्सेलन्सच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील महिला कॅरमपटूंसाठी दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा दोन गटांत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. येत्या 17 डिसेंबरला पॅरमची ही स्पर्धा कल्याणच्या नवरंग बँक्वेट हॉलमध्ये खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील महिलांना स्पर्धात्मक पॅरमचा अनुभव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून विजेत्यांवर 64 हजार रुपयांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार आहे. रोख पुरस्कारांसाठी आर्यन इन्स्टिटय़ूटचे प्रमुख दीपक वझे यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव जीतेंद्र दळवी यांच्याशी 9769380750 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

























































