‘या’ गावात 5 दिवस महिलांना राहावं लागत निर्वस्त्र, जाणून घ्या कारण

आपला देश हा रुढी-परंपरा, जाती, कायदे, प्रथा आणि विविधतेने नटलेला आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत प्राचीन काळापासून त्यांचे पालन केले जाते. परंतु यापैकी काही परंपरा या जगावेगळ्या आहेत ज्यांचा आपण कधी विचार देखील केला नसेल. हिंदुस्थानातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. त्या गावात महिला श्रावण महिन्यातील तब्बल 5 दिवस कपडे घालत नाहीत. या महिला असे का करतात?  यामागे देखील काही कारणे आहेत .

हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात या प्रथेचे पालन केले जाते. झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, या गावातील महिला श्रावण महिन्यातील पाच दिवस निर्वस्त्र राहतात. जर एखाद्या महिलेने ही प्रथा पाळली नाही तर काही दिवसातच वाईट बातमी ऐकायला मिळते, असं मानलं जातं. तसेच या परंपरेचा भाग म्हणून या काळात संपूर्ण गावातील विवाहित जोडपी म्हणजे पती पत्नी एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत.याशिवाय पती पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहतात.

झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, या गावातील महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील या प्रथांचं पालन करणं बंधनकारक आहे. या काळात पुरुष दारू व मांसाहाराचं सेवन करू शकत नाही. जर या रुढी- परंपरांच पालन केल नाही तर देवता क्रोधित होते आणि तुमचं मोठं नुकसान होतं असं मानल जातं.

पाच दिवस निर्वस्त्र राहण्याच्या या प्रथेमागे एक इतिहास दडला आहे. ‘लहुआ घोंड’ नावाच्या एका देवतेने या गावात राक्षसाचा वध करुन गावाचं रक्षण केलं होतं. हे सर्व राक्षस सुंदर कपडे घातलेल्या विवाहित स्त्रियांना गावातून उचलून घेऊन जातं होते. या राक्षसांपासून ‘लहुआ घोंड’ नावाच्या देवतेने महिलांचे रक्षण केले. त्या दिवसापासून पिनी गावात या विचित्र परंपरेला सुरुवात झाली.