World cup 2019 AUSvWI : कांगारूंचा इंडीजवर 15 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॉटिंग्हम

पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि दोन वेळचा विश्वविजेचा वेस्ट इंडीज संघात नॉटिंग्हमच्या ट्रेंटब्रिज मैदानावर रंगला. या लढतीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा 15 धावांनी पराभव केला.

त्याआधी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत इंडीजपुढे विजयासाठी 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. स्मिथ आणि नाथन कुल्टर नाईलच्या शतकी भागिदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 49 षटकात सर्व बाद 288 धावा रचल्या, स्मिथने 73 आणि कुल्टर नाईलने 92 धावांची खेळी केली.

Video : अद्भूत, अविश्वसनीय, अनाकलनीय! कोटरेलचा ‘हा’ झेल एकदा पाहाच

पाहा लाईव्ह अपडेट –

  • कांगारूंचा इंडीजवर 15 धावांनी विजय
  • 50 षटकात वेस्ट इंडीजच्या 9 बाद 273 धावा
  • नववा खेळाडू बाद
  • वेस्ट इंडीज पराभवाच्या छायेत
  • 42 चेंडूत 56 धावांची आवश्यकता
  • इंडीजचे चार खेळाड़ू बाकी
  • 60 चेंडूत इंडीजला विजयासाठी 68 धावांची आवश्यकता
  • इंडीज पराभवाच्या छायेत, रसेल बाद
  • वेस्ट इंडीजच्या 200 धावा पूर्ण
  • 35 षटकानंतर इंडीजच्या 5 बाद 190 धावा
  • होप बाद, इंडीजचा डाव संकटात

  • इंडीजला चौथा धक्का
  • होपचे अर्धशतक, इंडीजच्या आशा कायम
  • विजयासाठी आणखी 156 धावांची आवश्यकता
  • 25 षटकानंतर वेस्ट इंडीजच्या 3 बाद 133 धावा
  • इंडीजच्या 100 धावा पूर्ण
  • 99 धावांवर गमावली पूरनची विकेट
  • इंडीजला तिसरा धक्का

  • 15 षटकानंतर वेस्ट इंडीजच्या 2 बाद 78 धावा
  • पूरन-होपमध्ये 50 धावांची भागिदारी पूर्ण
  • दहा षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 54 धावा

#ICCWorldCup2019 एकच गोलंदाज, एकच सामना… पण गेल तीनदा बाद झाला

  • वेस्ट इंडीजच्या 50 धावा पूर्ण
  • गेलच्या वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण

  • पाच षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 31 धावा
  • गेल 21 धावांवर बाद, स्टार्कने घेतला बळी
  • इंडीजला मोठा धक्का
  • 2 षटकानंतर वेस्ट इंडीजच्या 1 बाद 7 धावा
  • इंडीजला पहिला धक्का, ल्यूईस बाद
  • वेस्ट इंडीजचा डाव सुरू

  • ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ, इंडीजपुढे 289 धावांचे आव्हान
  • कुल्टर नाईल 92 धावांवर बाद
  • कुल्टर नाईलचे शतक हुकले, ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

  • कोटरेलचा अद्भूत झेल, स्मिथ बाद

  • नाथन कुल्टर नाईल- स्मिथमध्ये 100 धावांची भागिदारी
  • नाथन कुल्टर नाईलचे अर्धशतक

  • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 206 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
  • नाथन कुल्टर नाईल- स्मिथमध्ये 50 धावांची भागिदारी
  • स्मिथचे अर्धशतक, कांगारूंची शेवटची आशा

  • 35 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 175 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
  • जोडी फुटली, कॅरी 45 धावांवर बाद
  • 30 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 146 धावा
  • स्मिथ-कॅरीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
  • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 119 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
  • 20 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 83 धावा
  • स्टॉयनिस 19 धावांवर बाद
  • कांगारूंची त्रेधातिरपीट, अर्धा संघ तंबूत

  • 15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 75 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण
  • 10 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 48 धावा
  • स्मिथ आणि स्टॉयनिसवर डाव सावरण्याचे आव्हान
  • मॅक्सवेल शून्यावर माघारी
  • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

  • इंडीजच्या वेगवान माऱ्यापुढे कांगारूंची त्रेधातिरपीट, रसेलने ख्वाजाला केले बाद

  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
  • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 32 धावा
  • डेव्हीड वॉर्नर 3 धावांवर बाद, शेल्टन कोटरेलने घेतला बळी
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
  • थॉमसने वेस्ट इंडीजला मिळवून दिले पहिले यश
  • ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, फिंच 6 धावांवर बाद

  • एक षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 10 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, फिंच आणि वॉर्नर मैदानात
  • ट्रेंटब्रिजच्या मैदानावर वेस्ट इंडीजने 8 लढती खेळल्या आहेत. यात 6 विजय, 1 पराभव पाहिला, तर 1 सामना अनिर्णित राहिला. वेस्ट इंडीजने एकमेव सामना 1984 ला येथे गमावला होता. त्यानंतरची प्रत्येक लढत त्यांनी जिंकली आहे.
  • सराव लढतीत वेस्ट इंडीजविरुद्ध दणदणीत खेळी करणारा स्मिथ आजही कमाल करणार?

  •  वेस्ट इंडीजचा संघ –

जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, एव्हीन ल्यूईस, शिमरोन हेटमायेर, एशले नर्स, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शाई होप, ओशाने थॉमस, शेल्टन कोटरेल

  • ऑस्ट्रेलियाचा संघ –

अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टिव्हन स्मिथ, ग्लैन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी (यष्टीरक्षक), नाथन कल्टर नाइल, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, एडम जाम्पा

  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले