
सामना ऑनलाईन । लंडन
वर्ल्डकप 2019 मधील नववा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 244 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान ठेवले आहे.
बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सलग दुसऱ्या लढतीत अर्धशतक ठोकले. परंतु इतर फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. शाकिबनंतर सर्वाधिक धावा मोहम्मद सैफूद्दीनने (29) केल्या. इतर फलंदाज लवकर बाद झाल्याने बांगलादेशचा संघ संपूर्ण 50 षटके खेळू शकला नाही. त्यांचा संघ 49..2 षटकात 244 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर बोल्टने 2, फर्ग्यूसन, ग्रॅडहोम आणि सँटनरने प्रत्येकी एक बळी घेतला.
Bangladesh are bowled out in the final over for 244. Matt Henry is again the pick of the bowlers, with 4/47. Can New Zealand chase this down? #BANvNZ Scorecard https://t.co/xB88JRa8Yz pic.twitter.com/sQgsS9uYGX
— ICC (@ICC) June 5, 2019


























































