
सामना ऑनलाईन । लंडन
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत माजी विश्वविजेता (1983 आणि 2011) हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे संघ प्रथमच उपांत्यफेरीत आमनेसामने उभे ठाकले आहेत. तर 44 वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत गतविजेता (2015) ऑस्ट्रेलिया व यजमान इंग्लंड संघ यंदा झुंजणार आहेत. गुणतालिकेत टॉपवर राहणाऱ्या टीम इंडियाचा उपांत्य मुकाबला 9 जुलैला चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडशी मँचेस्टरमध्ये रंगेल, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत तिसऱ्या स्थानावरील यजमान इंग्लंड 11 जुलैला दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी बर्मिंगहॅम येथे दोन हात करील.
सेमी फायनलपूर्वी मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हे’ 2 खेळाडू मुकण्याची शक्यता
क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत उपांत्य लढतीत हिंदुस्थान व न्यूझीलंड हे दोन संघ एकमेकांसमोर आले नव्हते. यंदा प्रथमच तो योग आला आहे. उभय संघातील साखळी लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली होती. त्यामुळे या दोन्ही संघांना विरोधी संघाच्या चुका आणि ताकदवार बाबी हेरता आलेल्या नाहीत. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल.
Semi-final 1️⃣ – India v New Zealand
Winner: ________Semifinal 2️⃣ – Australia v England
Winner: ________Final: SF1 winner v SF2 winner
Champion: ________Fill in the blanks #CWC19 pic.twitter.com/iq0bkIZYgs
— ICC (@ICC) July 7, 2019
दुरकीकडे ऑस्ट्रेलियन संघ परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंड विरोधात 44 वर्षानंतर उपांत्य लढतीत उभा ठाकणार आहे. यापूर्वी 1975 च्या विश्वचषक उपांत्य लढतीत हे उभय संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 4 विकेट्सनी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु अंतिम फेरीत वेस्ट इंडीजने त्यांचा पराभव करत विश्वचषक उंचावला होता.


























































