आज अग्निशमन दिन – कायदा पाळा, जीवित-वित्तहानी टाळा! दोन वर्षांनी फायर ऑडिट व्हायलाच हवे!

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. उत्तुंग इमारती, रुग्णालये, कार्यालयांच्या ठिकाणी लागणाऱया आगींमुळे जीकित-कित्तहानी होत आहे. फायर ऑडिट केलेच जात नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहे. हे टाळण्यासाठी कायद्यानुसार उत्तुंग इमारतींचे फायर ऑडिट दर दोन कर्षांनी करून आकश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत पालिकेचे माजी अग्निशमन अधिकारी सुभाष राणे यांनी व्यक्त केले.

आगी वाढण्याचे नेमके कारण कोणते?

– राष्ट्रीय इमारत संहिता कायद्यानुसार उत्तुंग इमारतींचे आवश्यक असणारे ऑडिट कधी होतच नाही. दुर्घटना घडल्यावरच हा प्रश्न समोर येतो. यामध्ये शॉर्टसर्किटमुळे 80 टक्के आगी लागल्याचे समोर आले असताना इलेक्ट्रिकल ऑडिट कधी होतच नाही. यामुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

– इमारती, कार्यालये अशा ठिकाणी ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढते. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रीय इमारत संहिता 2016 अध्याय 4 – कलम 4.10 नुसार मोठय़ा शिक्षण संस्था, 30 मीटर पेक्षा उंच व्यापारी इमारती, 60 मीटर पेक्षा उंच राहत्या इमारती, 15 मीटर पेक्षा उंच हॉस्पिटलसारख्या इमारती, पंचतारांकित हॉटेल्ससाठी अग्निशमन अधिकाऱयाची नेमणूक करण्याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्र अग्निशमन संचालयाने पुढाकार घेऊन शासनाच्या माध्यमातून या गोष्टी अमलात आणून काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.

अग्निशमन यंत्रणेत कोणते बदल आवश्यक आहेत?

मुंबई अग्निशमन दलात सद्यस्थितीत अनेक अत्याधुनिक बदल झाले आहेत. मात्र मुंबईसह राज्याच्या संपूर्ण अग्निशमन यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण होणे गरजेच आहे. कर्मचारी-अधिकाऱयांची रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत. 2006 मध्ये अस्तित्वात आलेल्या अग्निशमन कायद्याची अंमलबजावणी राज्यभर झाली पाहिजे.

नागरिकांची भूमिका यामध्ये किती महत्त्वाची आहे?

पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईभरात सर्वच आस्थापनांमध्ये मॉक ड्रिल, मार्गदर्शन शिबिरे, गॅस लिकेज-स्फोट झाल्यास घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले जाते. यामध्ये सहभागी होऊन दुर्घटनेप्रसंगी पळून न जाता बचावकार्यात सहभागी होऊन अग्निशमन दलाला सहकार्य केले पाहिजे. वेळोवेळी फायर ऑडिट करून आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या