‘यदाकदाचित रिटर्न्स’ नाटकासाठी संतोष पवार सज्ज

75

सामना प्रतिनिधी । मुंबई

लेखक, दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार यांनी २० वर्षांपूर्वी ‘यदाकदाचित’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे त्यावेळी सुमारे चार हजार प्रयोग केले होते. विनोदाचे असंख्य रंग या नाटकात होते. साहजिकच हे नाटक तेव्हा तुफान गाजले होते. आता २० वर्षांनंतर संतोष ‘यदाकदाचित रिटन्र्स’ हे नवीन नाटक नव्याने घेऊन येतोय. ‘श्री दत्तविजय प्रोडक्शन’ ही नाट्यसंस्था हे नाटक रंगभूमीवर आणतेय. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते अशी जबाबदारी संतोष पवार यांनीच सांभाळली आहे. १८ मे रोजी या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. अजय पुजारी (नेपथ्य), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), प्रणय दरेकर (संगीत) अशी तांत्रिक टीम असलेल्या या नाटकात तब्बल १६ तरुण कलाकार भूमिका साकारताना दिसतील.

आपली प्रतिक्रिया द्या