पदयात्रेला निघालेल्या 200 जणांना जेवणातून विषबाधा, मळमळ व उटलीचा त्रास; उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> > प्रसाद नायगावकर.

माहूर येथून महानुभाव पंथियांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मजल दरमजल करीत मार्गक्रमण करीत होती. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे ही पदयात्रा पोहोचली. येथे पदयात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. जेवण झाल्यानंतर काही वेळातच काही भक्तांना मळमळ व उटली हा त्रास सुरू झाला. काहींना लगतच्या गावातील खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा व यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

राजू घाटोळ यांच्या घरी चिकणी येथे पदयात्रेसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माहूर येथून मोझर मार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती. सोमवारी दुपारी जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. 40 जणांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात तर 18 जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींनी गावातच खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास 200 जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली.

नेमक्या कुठल्या पदार्थातून विषबाधा झाली, याची तपासणी करण्यासाठी अन्नाचे नमुने सोबत आणले आहे. या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली होती. दारव्हा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती धोक्याबाहेर सांगितले आणि रुग्णांची स्थिर असल्याचे सांगितले