
बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पार्टीच्या बहाण्याने मित्र घेऊन गेले आणि गळा दाबून 20 वर्षीय तरुणाची हत्या केली.
बिहारच्या भोजपुर जिल्ह्यातील आरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मृताचा मोठा भाऊ राधा सिंह याने पालिसांना दिलेल्या माहितीनूसार, बुधवारी संध्याकाळी त्याचा छोठा भाऊ मनोज सिंग याला गावातील त्याच्या चार मित्रांनी पार्टीसाठी बोलावले होते. पार्टीला गेलेला मनोज रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे आम्ही त्याचा शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी काही गावकऱ्यांनी राधा सिंहला माहिती दिली की, त्याच्या भावाचा मृतदेह शेतात सापडला असून त्याच्या भावाचे डोळे चाकूने कापले आहेत.
पालीस निरीक्षक बिनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्हाल माहिती मिळाली की बारा बसंतपूर गावाजवळ एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन व गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता.
अजय मेहतो या आरोपीकडे मृत मोहनच्या मजुरीपैकी 500 रुपये थकीत असल्याची माहिती सुद्धा राधा सिंहने पोलिसांना दिली. मोहन आपल्या हक्काच्या पैशांची आरोपीकडे वारंवार मागणी करत होता. त्यामुळे 500 रुपये मजुरी मागितल्याच्या वादातून मित्रांनी तरुणाची हत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.





























































